अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-आज प्रत्येक गावात, शहरात, देशात जाती, पाती, धर्म, वंश यावरून वाद निर्माण होत असून पक्ष व पाटर्यांमधील व्देश भावनाही वाढत चालली आहे.
त्यामागे निवडणूका हेच कारण असून देशातील व्देशभावना कमी करायची असेल तर आ. नीलेश लंके यांनी उचचलेेले पाऊल अतिशय महत्वाचे आहे.
लोकशाही बजबूत झाली पहिजे, प्रबळ झाली पाहिजे. ती दिल्लीतून, मुंबईतून होणार नाही तर गल्ली बदलल्याशिवाय दिल्ली बदलणार नाही.
त्याचसाठी बिनविरोध निवडणूकांचा आ. लंके यांचा उपक्रम महत्वाचा असून ग्रामपंचायतींच्या बिनविरोध निवडणूकांसाठी आ. लंके यांचा प्रचारक म्हणून मी काम करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे बोलताना जाहिर केले.
पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून त्या त्या गावांतील नागरीकांनी बिनविरोध निवडणूक करावी,
आमदार निधीमधून त्या गावांना २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा आ. नीलेश लंके यांनी केली आहे. निवडणूका बिनविरोध करण्यासाठी आ. लंके हे स्वत: विविध गावांच्या बैठका घेत असून सुपे गटातील बैठकांदरम्यान राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पाश्वभुमिवर शनिवारी सकाळी आ. नीलेश लंके यांनी राळेगणसिद्धीत जाउन हजारे यांची भेट घेतली. बिनविरोध निवडणूकांदर्भातील माहीती त्यांनी हजारे यांना दिली. यावेळी बोलताना हजारे यांनी संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतींनी राळेगणसिद्धीचा आदर्श घेण्याचा आवाहन केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये