अहमदनगर Live24 :- अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्ष वयाच्या तरुणीला आरोपी ओंकार लक्ष्मण सदाफळ याने इशारा करुन माझ्याबरोबर चल, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.
तरुणीने जाब विचारताच आरोपी व त्याच्या आई-वडिलांनी तरुणीच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन लाकडी दांड्याने मारहाण केली. महिलेने पोटात लाथ मारली तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला.
तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी ओंकार लक्ष्मण सदाफुले, लक्ष्मण सदाफुले, लक्ष्मी लक्ष्मण सदाफुले, सर्व रा. लोंढे मळा, केडगाव यांच्याबिरुद्ध कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®