अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव शनिवारी दुपारपर्यंत कोपरगाव येथे करण्यात आलेल्या ७३ रॅपिड अॅण्टिजेन टेस्टमध्ये १८ जणांचे अहवाल बाधित, तर ५५ निरंक आले.
शनिवारी बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या ३० असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातील बाधितांचा आकडा ३२८ वर पोहचला. त्यापैकी १३६ रुग्ण बरे झाले असून अॅक्टिव्ह रुग्ण १८८ आहेत. ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. आज आढळलेल्या रुग्णात चांदेकसारे १,
येसगाव १, पोहेगाव ८, सोनारी ३, ब्राम्हणगाव २, टाकळी १, तर कोपरगाव शहर जानकी विश्व येथील १ आणि शहरातील सुभद्रानगर येथील १ असे एकूण १८ जणांचा समावेश आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved