अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- श्रीरामपुरात सोमवारी रॅपिड चाचणीत तीन सापडले. १४ जुलैला आरोग्य विभागाने शहरात शिबिर घेतले. यावेळी संशयितांच्या घेतलेल्या स्वॅबमधील १५ जणांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले.
आठ दिवसांनंतर हे अहवाल आले. याचबरोबर शहरातील इतर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण आकडा १२२ वर पोहोचला.

file photo
५२ जणांना डिस्चार्ज दिला. सध्या ४६ जणांवर उपचार सुरू आहेत. ११५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा