अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत राज्यातील जवळपास नऊ मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
यामध्ये राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन आणि एका अपक्ष मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या अनिल परब यांना उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, काल राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत अनिल परब सुद्धा उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved