चिंता वाढली! ‘ह्या’ तालुक्यात नव्याने आढळले ११ रुग्ण

Published on -

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

श्रीरामपूर शहरात रविवारी आढळलेल्या कोरोनाबाधिताच्या कुटुंबातील चार, वाॅर्ड २ मध्ये पाच, तर फातेमा हौसिंग सोसायटीतील दोघांचा रॅपिड टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह अहवाल आल्याने ११ नवीन रुग्णांची भर यामध्ये पडली आहे.

त्यामुळे तालुक्यातील रुग्णांचा आकडा ९७ वर पोहोचला आहे. यावेळी ४२ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यातील ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe