राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-राष्ट्रीय कार्यक्रम व इतर महत्वाच्या प्रसंगी राष्ट्रध्वजाचा वैयक्तिकरित्या वापर केला जातो.

मात्र, असे करताना राष्ट्रध्वजाची अवहेलना आणि अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

याशिवाय, प्लास्टीकचे राष्ट्रध्वज विकण्यास आणि त्याच्या वापरावरही प्रतिबंध असून नागरिकांनी त्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशाननाने हे आवाहन केले आहे. ध्वजसंहितेतील सर्व नियमांची आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

तसेच खराब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावेत. अशासकीय संस्था,

इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी असे राष्ट्रध्वज आढळल्यास जवळच्या तहसील कार्यालयात जमा करावेत. प्रत्येकाने राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे