अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-विद्यार्थी काँग्रेसच्या (एनएसयूआय) नगर शहर अध्यक्षपदी चिरंजीव गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर येथे काँग्रेस पक्षाच्या उत्तर विभागाची आढावा बैठक पार पडली.
यावेळी गाढवे यांना आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मान्यतेने गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीसाठी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शिफारस केली होती. विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर यांनी गाढवे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
यावेळी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. लहू कानडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, भाऊसाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर, युवा पुरस्कार विजेते भैय्या बॉक्सर, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबूज आदी उपस्थित होते.
निवडी नंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना गाढवे म्हणाले की, ना. बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे पाटील, आ. सुधीर तांबे तसेच शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामध्ये विद्यार्थ्यांचे, युवा वर्गाचे संघटन एनएसयूआयच्या माध्यमातून मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे. शहराच्या सर्व कॉलेजेसमध्ये शाखा उघडणार आहे.
जिल्हा उपाध्यक्षपदी दानिश शेख :- दानिश शेख यांची विद्यार्थी कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेख मागील तीन वर्षांपासून शहराचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
त्यांना जिल्हा कार्यकारणी मध्ये बढती देण्यात आली आहे. शेख यांनी यावेळी बोलताना विश्वास व्यक्त केला की, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात नगर शहरासह जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांचे उत्तम संघटन उभे करील.
फोटो ओळी : – निवडी नंतर नवनियुक्त नगर शहर अध्यक्ष चिरंजीव गाढवे, जिल्हा उपाध्यक्ष दानिश शेख यांचा आ. सुधीर तांबे, किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. लहू कानडे, थोरात कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, एनएसयूआयचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर, युवा पुरस्कार विजेते भैय्या बॉक्सर, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबूज आदी उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com