राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रुपेश काळेवाघ व नगर तालुका अध्यक्षपदी अमोल शिंदे यांची निवड करण्यात आली. या नुतन पदाधिकार्‍यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, निलेश बांगरे, साधनाताई बोरुडे, नितीन जठार, संजय काळे, अभिजीत उजागरे, विशाल सकट, निलेश गायकवाड, बाबासाहेब शेंडगे,

अजय शेंडगे, श्रीकांत शिंदे, विशाल शिंदे, अजय शिंदे, वैभव शिंदे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून युवकांना समाजाच्या तळागाळातील प्रश्‍न सोडविण्यासाठी संधी देण्यात आली आहे.

नुतन जिल्हा उपाध्यक्ष काळेवाघ व नगर तालुका अध्यक्ष शिंदे हे पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पध्दतीने सांभाळतील. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन पक्षाची वाटचाल सुरु आहे.

या भावनेने नुतन पदाधिकारी कार्य करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षीत घटकांचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबध्द राहणार असल्याची भावना नुतन जिल्हा उपाध्यक्ष काळेवाघ व नगर तालुका अध्यक्ष शिंदे यांनी व्यक्त केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment