राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उंबरकर यांची नियुक्ती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सरूनाथ सुखदेव उंबरकर यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिले. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढवय्ये कार्यकर्ते म्हणून उंबरकर परिचित आहेत.

संगमनेर पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कामाचा ठसा उमटवला. उंबरकरांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, टोलनाका संघर्ष समितीवर काम केले. ग्रामीण भागातील रस्ते, वीज व जायकवाडी पाणीप्रश्नाच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.

पक्ष संघटना वाढीसाठी कार्यकर्त्याना बळ देण्याचे काम करणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या योजना तळागाळातील सर्व सामान्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

अागामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून कार्यकर्त्याला न्याय देऊ. आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचे उंबरकरांनी सांगितले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, कपिल पवार, प्रशांत वामन, सौरभ देशमुख, वैशाली राऊत यांनी अभिनंदन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment