सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी उषाताई तनपुरे यांची नियुक्ती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई प्रसाद तनपुरे यांची सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.

डॉ. तनपुरे या मुंबई विद्यापीठातून १९७२ साली एम. बी. बी. एस. झाल्या. सासरी व माहेरी समाजकारण राजकारणाचे मार्गदर्शनामुळे वैद्यकीय पदवीचा उपयोग त्यांनी गरिबांना आरोग्यसेवा देण्यासाठी केला होता.

आज त्या वैद्यकीय सेवेत कार्यरत नसल्या तरी राजकारणातील सक्षम महिलानेत्या म्हणून त्यांचा लौकिक आहे. महिलांचे सक्षमीकरण, महिलांना आर्थिक दृष्टया सबल करणे या गोष्टींवर त्यांचा विशेष भर असून

त्यांनी राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा म्हणून १०वर्ष काम पाहिले आहे. आज त्या राहुरी नगरपालिकेच्या गट नेत्या, जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या आहेत.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वत:चे पायावर उभे करुन महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तंूना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.डॉ.तनपुरे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment