अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी नगर शहरातील पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी दिली असून बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी मिळून जरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या सुपारीमधील ६ लाख २० हजार रुपयांची रक्कम चोळके याच्याकडून जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
ह्या संपूर्ण हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी विमान प्राधिकरणला तसे कळवले आहे. तर, पोलिसांच्या पथकाने आज बोठे याच्या घरातून शस्त्र जप्त केले आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, ‘आरोपी बोठे याला पकडण्यासाठी आमची पाच पथके कार्यरत आहेत. बोठे याच्या घराची आज पुन्हा झाडाझडती घेतली असून, काही महत्त्वपूर्ण वस्तू व कागदपत्रे जप्त केली आहेत.
अवैद्य धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी करा :- ‘रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला तात्काळ अटक करून त्याच्या अवैद्य धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी करा, तसेच अवैद्य संपत्ती जप्त करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देविदास खेडकर यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
खुनाचे कारण अजूनही अस्पष्ट :- पोलीस तपासात रेखा भाऊसाहेब जरे यांना सुपारी देवून संपविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दोघा हल्लेखोरांव्यतिरिक्त आणखी चार जणांचा या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
चोवीस तासांच्या आत यातील काही आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्याने गुन्ह्याचा उलगडा होत गेला आहे. तथापि, खुनाचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved