अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील मतिमंद युवतीवरील कथित बलत्कारप्रकरणात पीडितेच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अटक केलेला माझा मुलगा अजित निर्दोष आहे.
खऱ्या गुन्हेगाराचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधितांचे रक्ताचे नमुने, मृत अर्भकाचे रक्त, केस, नखे, हाडांची डीएनए व आरएनए चाचणी करण्यात यावी,

अशी मागणी रंगनाथ बजाबा फलके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांना आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved