Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात तालुका पोलिसांना ७ महिन्यानंतर यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद दत्तात्रय गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) याने एका अल्पवयीन मुलीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केला होता.

Ahmednagar News
याबाबत त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा आरोपी तेव्हापासून फरार होता. पोलिसांनी त्याच्या तपासासाठी प्रयत्न केले.
सदर आरोपी हा सिन्नर येथे राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. ही माहिती मिळतात पोलिसांनी सिन्नर येथे जाऊन त्याला अटक केली.