अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली असून आज अखेर ५९ ग्रामपंचायती मधून २१ ग्रामपंचायतसाठी तब्बल १२८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
दरम्यान आज अखेर दाखल झालेल्या अर्जामध्ये देऊळगाव ०६, चिखलठाणवाडी ०३, टाकळी कडेवळीत ०२, वांगदरी ०२, चांडगाव ०८, चाभुरडी ०१, राजापूर ०२, सुरेगाव ०२, गूगल वडगाव १८, भानगाव ०४, निमगाव खलू ०२,
आढळगाव १०, ढवळगाव ११, पिंपरी कोलंदर ०५, कोंडेगव्हान ०३, खांडगाव ९, बांगरडे ५, सांगवीदुमाला २५, बेलवंडी कोठार ५, गव्हाणेवाडी १४, असे एकूण २१ गावातून तब्बल १२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
मात्र अद्यापही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी असल्यामुळे अजून किती उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved