भाजपचे पहिली यादी जाहीर होताच राहुरीतुन कदम पिता -पुत्र करणार बंडखोरी? भाजपला लागले बंडखोरीचे ग्रहण

पहिली यादी जाहीर होताच मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Ajay Patil
Published:
vidhansabha nivdnuk

Ahilyanagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असून प्रत्येक जण आता तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या या भाऊगर्दीने प्रत्येक पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे.

इच्छुकांची भाऊगर्दीमुळे प्रत्येक पक्षाला बंडखोरीला तोंड द्यावे लागते की काय अशी परिस्थिती बऱ्याच मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. या अनुषंगाने जर आपण बघितले तर कालच भाजपच्या माध्यमातून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

परंतु ही पहिली यादी जाहीर होताच मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

परंतु त्यामुळे मात्र भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम व त्यांचे पुत्र सत्यजित कदम हे नाराज झाले आहेत.भाजपाला राहुरीतून बंडखोरीचे ग्रहण लागले असे म्हटले तरी आता वावगे ठरणार नाही.

राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम व त्यांचे पुत्र सत्यजित कदम हे इच्छुक होते. परंतु वेळेला मात्र शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कदम पिता पुत्र यांचे तिकीट कापले गेल्याने ते आता नाराज झाले आहेत.

 येत्या दोन दिवसात घेणार निर्णय

राहुरी विधानसभा मतदारसंघातून तिकीट कापले गेल्यामुळे सत्यजित कदम यांनी उघडपणे त्यांची नाराजी व्यक्त केली असून त्यांनी याबाबत म्हटले की मी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले.

मी कार्यकर्त्यांमुळे नेता झालो आणि आता  कार्यकर्त्यांनाच विचारून पुढचा निर्णय घेणार असून येत्या दोन दिवसांनी याबद्दलचा निर्णय घेईल असे देखील सत्यजित कदम यांनी म्हटले आहे. तसेच चंद्रशेखर कदम यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली असून मागच्या वेळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे हित पाहून मी थांबलो होतो.

परंतु पक्षाने जो शब्द दिला होता तो पक्षाने पाळला नाही. आता सत्यजित कदम आणि कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत मी ठामपणे उभा राहील असे देखील आता चंद्रशेखर कदम म्हटले आहे.2019 विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र सत्यजित कदम हे इच्छुक होते.

परंतु तेव्हा देखील शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली होती व शिवाजी कर्डिले यांचा तेव्हा पराभव झाला होता. 2024 च्या विधानसभेसाठी आता सत्यजित कदम इच्छुक होते व त्यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या होत्या.

परंतु काल अचानकपणे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना राहुरी विधानसभेतून उमेदवारी देण्यात आल्यामुळे आता कदम पिता पुत्र बंडखोरी करतात की काय? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe