अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-नवनागापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देऊन नगर एमआयडीसीमध्ये नविन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करु. या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
तसेच नवनागापूरच्या विकासाला चालना मिळेल. ग्रामपंचायत ही गावच्या विकासातील मुख्य दुवा आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम होते.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना गावामध्ये राबविण्यात येत असतात. निवडणुका संपल्या की गावाने आपआपसातील मतभेद विसरुन गावच्या विकासासाठी एकजूटीने काम करावे.
असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांनी केले. नवनागापूर ग्रामपंचायच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे व उपसरपंचपदी संगीता दत्तात्रय सप्रे यांची निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रविकुमार पंतग,
व ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. मिसाळ यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. उपसंरपंच संगीता सप्रे म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५0 टक्के आरंक्षण मिळाले आहे. या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली आहे.
नवनागापूरमधील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य क्रम दिला जाईल. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास गावाच्या विकासाला चालना मिळते.
प्रत्येक ग्रामपंचायतच्या विकासामुळे राज्याच्या व देशाच्या प्रगतीत भर पडत असते. यासाठी सर्वांनी एकीच्या बळावर गावाच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. असे त्या म्हणाल्या.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2021, all rights reserved