‘हुकुमशाही बद्दल भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते खर सांगतील’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : भारतीय जनता पार्टीचे नेते हे स्वतःला हुशार समजत असतील तर आमच्या महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

एवढ्यावरच रोहित पवार थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजप सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी आणि हुकूमशाही होती.

भाजपाच्या नेत्यांना जरा खासगीत विचारा, ते सुद्धा तुम्हाला असेच सांगतील, असा अप्रत्यक्ष टोला रोहित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे.

या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “भाजपाकडे सरकारवर टीका करण्यास मुद्दे नाहीत. त्यामुळे समन्वयाबद्दल बोलले जात आहे.

मात्र, याला काही अर्थ नाही. भाजपाचे राज्यातील नेते राजकीय पतंग उडवून जनतेची दिशाभूल करत आहेत.” याशिवाय, आघाडी सरकारमध्ये कुठलाही मतभेद नाही.

वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सर्व निर्णय घेतले जातात, असे रोहित पवार यांनी सांगितले. भाजपच्या आमदारांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधीला मदत न करता

पंतप्रधान निधीला पैसा (पीएम केअर्स) दिला. त्यातून केंद्र सरकारने खरेदी केलेले व्हेंटिलेटर्स महाराष्ट्रात पाठवले आहेत. परंतु ते खराब आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल केंद्र सरकारला विचारणा करावी, असाही टोला रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment