राहुरीतील प्रलंबित प्रश्नासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडं

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राहुरी तालुक्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झाले असता शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी त्यांचे स्वागत केले.

राहुरी तालुक्यामध्ये अनेक प्रलंबित खवरे प्रश्नांसंदर्भात त्यांनी पवार यांच्याशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रश्नांबाबत चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावू असे आश्वसन त्यांनी दिले.

यावेळी त्यांच्या समवेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे राहुरी तालुकाप्रमुख विजय ढोकणे, राहुरी शहरप्रमुख संतोष येवले, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश खेवरे,

उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब मुसमाडे, राहुल चोथे, नंदू हरिश्चंद्रे, ज्येष्ठ शिवसैनिक कैलास शेळके, पोपट शिरसाठ, सुनील शेलार, राजू सातभाई, हमिद पटेल, प्रमोद आढाव, संतोष शेळके, शिवाजी जाधव, कैलास शेटे,

योगेश जाधव, विठ्ठल कोळसे, जयेश वाकचौरे, कन्हैया दिघे, सोमा पागिरे, सचिन मुसमाडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पवार यांनी सदर प्रश्नांबाबत माहिती घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द शिवसैनिकांना दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment