चाकू, बंदुकीच्या जोरावर शिर्डी संस्थांच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-शिर्डी साईबाबा संस्थान येथून कामावरून आपल्या घरी परतत असताना रात्रीच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील अशोक लोंढे यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्राणघातक हल्ल्यात यात लोंढे व त्यांचे मित्र जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, यशवंत बाबा चौकीच्या ठिकाणी अशोक लोंढे

यांच्या एच. एफ.डिलक्स एम.एच. 17-9055 या गाडीला थांबवण्यासाठी गाडीच्या पाठीमागून डॅश मारून पाडण्यात आले व हल्लेखोरांनी चाकूचा व बंदुकीच्या धाक दाखवून पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र लोंढे यांनी चाकू डाव्या हाताने पकडून धरला व बंदुकीच्या धाक दाखवणार्‍याच्या अंगावर लोटून बाजुच्या खड्ड्यात उडी मारून पळून गेले. थोडे दूर जाऊन त्यांनी घडलेल्या घट्नेनाबाबत आपल्या मित्रांना फोनद्वारे कळविले.

दरम्यान लोंढे पळून गेले मात्र घटनास्थळी आलेल्या लोंढे यांचे मित्र अजय शिंदे, नितिन मकासरे, बिभीषण गायकवाड, दीपक जगताप यांनी लोंढे यांच्या डाव्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना दत्तनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

लोंढे यांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर जखम झाली असून 7 ते 8 टाके पडले आहेत. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून दोन दिवसांत पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांना अटक केली नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.