सातवा वेतन आयोग व इतर प्रश्‍न सोडविण्याचे आमदार जगताप व राज्यमंत्री तनपुरे यांचे आश्‍वासन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग तसेच 511 व 305 कर्मचार्‍यांना लाड समिती नुसार सफाई कामगारांना वारस हक्काने कायम नोकरीत सामावून घ्यावे

अशी मागणी महापालिका कामगार संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप व नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली.

आमदार जगताप यांनी दोन्ही मागण्या मंजूर होण्यासाठी लवकरात लवकर विधानसभेमध्ये ठोस निर्णय घेण्याचे व राज्य मंत्री तनपुरे यांनी सदर प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

नुकतेच आमदार संग्राम जगताप यांचा सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर महानगरपालिका कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महानगरपालिका कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाब राजाराम गाडे, दादाभाऊ कळमकर, पै.अंकुश मोहिते, अनिल मंडलिक, सागर साठे, गोपीनाथ अडागळे, विठ्ठल उमाप आदि उपस्थित होते.

सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप व नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे गुलाब गाडे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe