Ahmednagar News : मनोज जरांगे यांच्या मागणीवर कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस भूमिका न घेतल्याने कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने समाज विभागला गेला.
आता गावागावात सामाजिक भांडणाच्या वल्गना होत आहेत. आरक्षण हे विकासाचे साधन आहे. मात्र हा विषय सरकार व न्यायालयाचा असल्याने याबाबत अधिक बोलणे योग्य नाही.

मात्र दुसरीकडे काही लोकांकडून ‘महाराष्ट्राचा मणिपूर होईल का?’ असा मुद्दा उपस्थित करून ‘महाराष्ट्राचा मणिपूर करा’ असे सुचवले जातंय. त्यातून ते भांडण लावण्याचे काम करीत आहेत. मात्र, आपल्या गावातले वातावरण बिघडणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
तसेच, हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची चाल नाकारता येत नाही. अशी शंका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
ऍड.आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २५ जुलै रोजी दादर (मुंबई) येथील चैत्यभूमीतून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निघालेली एससी, एसटी, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जामखेड शहरातील खर्डा चौकात आली. नंतर चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर येथे दर्शन घेण्यात आले.
अहिल्यादेवीचे वंशज अविनाश शिंदे यांनी डॉ. आंबेडकर यांचे स्वागत केले. भारतीय बौद्ध महासभा, मुस्लिम पंच कमिटी, ग्रामस्थ तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत या यात्रेचे स्वागत केले.
यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, सध्या आरक्षणाच्या मुद्द्द्यांवरून महाराष्ट्रात मराठा विरूद्ध ओबीसी अशी राजकीय लढाई सुरू आहे.
ही लढाई अशीच सुरू राहिल्यास मराठा समाज ओबीसीला मतदान करणार नाही अन् ओबीसी समाज मराठा समाजाला मतदान देणार नाही. हे राजकीय भांडण आहे. मात्र काहीजण यात तेल ओतण्याचे काम करीत आहेत.
तसेच काही लोकांकडून ‘महाराष्ट्राचा मणिपूर होईल का?’ असा मुद्दा उपस्थित करून ‘महाराष्ट्राचा मणिपूर करा’ असे सुचवलं जातंय. अशी टीका देखील शरद पवार यांचे नाव न घेता केली.
त्यातून ते भांडण लावण्याचे काम करीत आहेत. मात्र, आपल्या गावातले वातावरण बिघडणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच, हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची चाल नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना जागा दाखवून द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले.