कुदळ, रॉडने मारून दोघा शेतकऱ्यांच्या खुनाचा प्रयत्न !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राहाता तालुक्यातील लोहगाव शिवारात गट नं. ६० मध्ये तरुण शेतकरी किशोर अनिल कडू, (रा. तिसगाववाडी, ता. राहाता) हा विद्यार्थी व भाऊ गौरव अनिल यांचे जनावरांना चारा टाकण्यासाठी कोर्टात जमिनीच्या वाद चालू असून

या शेतजमिनीजवळून जात असताना आरोपींनी किशोर कडू, गौरव कडू यांना तुमचा या जमिनीशी काही संबंध नाही.तुम्ही येथे यायचे नाही, असे म्हणून वाईट शब्दात शिवीगाळ करुन कोयत्याने वार केले.

लोखंडी रॉडने मारले व कुदळ डोक्यात मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात गौरव कडू व किशोर कडू हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किशोर कडू याच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल दिलीप नेहे, किशोर लहानु नेहे, वसंत लहानू नेहे, सुरेश लहानू नेहे, सचिन वसंत नेहे, सर्व रा.लोहगाव यांच्याविरुद्ध लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोना कुसळकर हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment