‘त्या’ नगरसेवकांच्या घरवापसीवेळी माजी आ. औटी यांना ‘मातोश्री’वरून निरोपच नाही ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :पारनेर नगरपंचायतीतील ‘त्या’ पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले.

यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल

अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे सुतोवाच केला. शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतत असताना सेनेचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी मातोश्रीवर उपस्थित नव्हते.

त्यांना बोलविण्यात आले नव्हते असे समजते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या पाच नगरसेवकांनी लेखी पत्र ठाकरे यांना दिले असून त्यात औटी यांच्याबाबत तक्रार केली असल्याचे समजते. मात्र, हे पत्र माध्यमांसमोर उघड करण्यात आलेले नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment