कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- प्रवरा परिसरात वाढता कोरोनाचा प्रसार पाहताना नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करणे, तसेच कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रवरा परिसरातील लोणी, कोल्हार, चंद्रापूर, दाढ येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर, तसेच परिसरातील एका बँकेतील एक व एका खासगी क्लासचालकाला कोरोना झाल्याचे

आढळून आल्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे. यामुळे डॉ. राजेंद्र विखे यांनी पत्रक काढून परिसरातील नागरिकांना पुढील काही दिवस काळजी घेणे व शासकीय सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

यामुळे प्रवरा परिसरातील नागरिकांनी नियमित मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे,

गर्दीच्या ठिकाणी न जाणे, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधे घेणे अशा उपाययोजना कराव्यात,

तसेच जर ताप किंवा खोकला असेल, तर जवळच्या आरोग्य सेवा केंद्रात डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. विखे यांनी केले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment