अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती करुन, महिलांना वाण म्हणून मास्कचे वाटप करण्यात आले.
नुकताच बुरुडगाव रोड येथील सौरभ कॉलनीत महिलांचा हा पारंपारिक सोहळा एकमेकींच्या आरोग्याची काळजी घेत पार पडला. यावेळी अॅड. प्रणाली चव्हाण, मनिषा भळगट, स्विटी लोढा,
सौ. बजाज, सुनिता थिटे, दुर्गावती चव्हाण, निलीमा पाटकर, सौ. आंधळे, मुथा, सोनाली गांधी, जिया सिंग, कदम, सातपुते, अॅड. सामलेटी, संध्या चव्हाण, डॉ.गौरी चव्हाण आदींसह महिला उपस्थित होत्या.
अॅड. प्रणाली चव्हाण म्हणाल्या की, कोरोनाने माणुसकी जागृक ठेऊन एकमेकांना सहकार्य करण्याचे शिकवले. मंदिर-मस्जिद बंद असताना माणुसकी धर्म प्रत्येकाने जपला व माणसात देव शोधण्यात आला.
प्रत्येक सांस्कृतिक व धार्मिक कार्यास सामाजिक उपक्रमाची जोड असणे आवश्यक आहे. मराठी संस्कृती जपत व इतरांच्या आरोग्याची काळजी घेत हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित महिलांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बचावात्मक उपाय योजनेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून मास्क ही अत्यावश्यक गोष्ट बनली असताना,
महिलांना वाणच्या स्वरुपाता मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गावती चव्हाण यांनी केले. आभार डॉ. गौरी चव्हाण यांनी मानले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved