जागतिक एड्स दिनानिमित्त पथनाट्यातून जनजागृती एमआयडीसीत स्थलांतरीत कामगारांची आरोग्य तपासणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ व आश्रय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त एमआयडीसी परिसरात पथनाट्य घेऊन स्थलांतरीत कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करण्यात आली.

तर कामगारांसाठी आरोग्य शिबीर घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. जागतिक एड्स दिन साजरा होत असताना अशिक्षित घटक असलेल्या स्थलांतरीत कामगारांमध्ये एड्सची जनजागृती करुन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून स्थलांतरीत कामगारांसाठी अमृतदिप प्रकल्प राबविला जात असून या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी 103 स्थलांतरीत कामगारांची आरोग्य तपासणी करुन उपस्थित कामगारांना गुप्तरोग व एड्सबद्दल माहिती देऊन हे आजार टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. आजही एचआयव्ही बांधितांनी तिरस्काराने पाहिले जाते. एड्स आजार टाळण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. काही कारणांनी एड्सची लागण होत असली तरी या रोगाने ग्रस्त असलेला व्यक्ती समाजातील एक घटक आहे. या भावनेने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याची भावना जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा रुग्णालयाचे ए.आर.टी. विभाग प्रमुख डॉ. पानसंबळ, आसीटीसीचे समुपदेशक राहुल कडूस, डॉ. आरती आळकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. आश्रय संस्थेचे सोमनाथ बर्डे, अजय दळवी, स्वप्नील मधे, कृष्णा बर्डे या स्वयंसेवकांनी एड्सच्या जनजागृतीवर पथनाट्य सादर केले. उपस्थितांचे आभार अमृतदिप प्रकल्पाचे व्यवस्थापक राजु पाटोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी अमृतदिप प्रकल्पाचे समुपदेशक पल्लवी तुपे, लेखाधिकारी श्रीकांत शिरसाठ, क्षेत्रिय अधिकारी विकास बर्डे, मच्छिद्र दुधवडे, ऋतिक बर्डे, अनिल दुधवडे यांनी परिश्रम घेतले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment