आयुष्यमान भारत कार्ड व गोल्डन कार्ड काढून घेतले पाहिजे – आ. राजळे

Ahmednagar News : जनता हेच माझं खर दैवत आहे. महिला, शेतकरी व युवकांसाठी काम करताना मला समाधान मिळते आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना गरिबांच्या झोपडीत घेवुन जाण्याचे काम आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्वजण मिळून करीत आहोत.

सरकार व जनता यांच्यात मध्यस्थांची भूमिका युवकांनी करावी, असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त दादापाटील राजळे महाविद्यालयात महिलांसाठी सर्वरोगनिदान शिबीर व विद्याथ्यांसाठी बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी डॉ. विनायक हाडके, डॉ. निलेश म्हस्के, बाजार समितीचे सभापती सुभाष बड़ें, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, राहुल राजळे, उद्धवराव वाघ, सरपंचमोनाली राजळे, युवानेते कृष्णा राजळे, काकासाहेब शिंदे, महेश बोरुडे (खरवंडी), यशवंत गवळी, जे. आर पवार, सुभाष बुधवंत, कार्यकारी संचालक महाजन साहेब, विनायक म्हस्के यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी बोलताना राजळे यांनी महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. महिला घरात काम करीत असताना त्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी आयुष्यमान भारत कार्ड व गोल्डन कार्ड काढून घेतले पाहिजे.

पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्याचा खर्च मोफत आहे. त्यामध्ये अनेक हॉस्पिटल्सदेखील उपलब्ध आहेत. महिला सक्षमीकरण करताना महिलांचेप्रश्न सुटले जावेत, यासाठी सराकरी योजनांचा लाभ त्यांना मिळावा,

यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयकाची भूमिका बजावावी. मुलांचे शिक्षण महत्वाचे असल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे राजळे म्हणाल्या. प्रास्ताविक राजधर टेमकर यांनी केले. सूत्रसंचालन योगिता इंगळे यांनी केले.