बाळ बोठेचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार,सदस्य पदही होऊ शकते रद्द !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये सुध्दा पुस्तक रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल,असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सांगितले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या

बाळ बोठे यांचे ‘राजकीय पत्रकारिता’ हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या ‘पॉलिटिकल जर्नलिझम’ या विशेष अभ्यासक्रमासाठी (एस-2) नेमण्यात आले आहे. गेल्या वर्षापासूनच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठासह विविध विद्यापीठात पॉलिटिकल जर्नलिझम नावाचा पेपर सुरू आहे.

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यास मंडळातील काही सदस्यांची निवड नॉमिनेशन मधून केली जाते. विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून बोठे यांचे नॉमिनेट करण्यात आले होते.

विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार गंभीर गुन्ह्यातील घटनेतील आरोपीला विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यापासून मज्जाव करता येतो. तसेच अशा व्यक्तीचे सदस्य पद विद्यापीठाचे कुलगुरू रद्द करू शकतात,असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment