अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा विचार हा शास्वत विचार असून तोच देश हिताचा आहे.
सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाला लागलेली गळती पाहून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, भाजपातून कोणीही जाणार नाही, असा खोटा दावा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागत आहे, असेही थोरात म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य रमेश जगताप,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मदन पथवे, सावरगावपाठचे सरपंच रमेश पवार, समशेरफट गावचे सरपंच भास्करराव दराडे, देवगण गावचे एकनाथ सहाणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी थोरात यांनी मार्गदर्शन केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved