धमाकेदार सेल ! मोबाईल, लॅपटॉप, इलेकट्रोनिक वस्तूंवर बम्पर सूट , वाचा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- आता 2020 संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. हे वर्ष तसे अनेक संकटांनी भरलेले गेले. आता नवीन वर्ष सुरु होईल. नवीन वर्ष नव्या जोमाने सुरु करण्यास अनेक लोक उत्सुक आहेत. अनेक लोकांना नव्या वर्षात अनेक गोष्टी खरेदीही करायच्या आहेत.

या खरेदीदारांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षांच्या अखेरीस Xiaomi Mi Fan Sale सुरू असून आपल्याला बंपर डिस्काउंट आणि ऑफर जाहीर करण्यात आल्या आहेत.

22 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या No. 1 Mi Fan Sale मध्ये Redmi आणि Mi स्मार्टफोन तसेच टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर भरपूर सूट मिळत आहे. जाणून घेऊयात त्याविषयी –

कोणत्या मोबाईलवर किती सूट – या सेलमध्ये Redmi Note 9 Pro आपल्याला केवळ 13999 रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल. तर Redmi Note 9 Pro Max आपल्याला 16999 रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल. Redmi Note 9 अवघ्या 11999 रुपयांत उपलब्ध असेल.

तर Xiaomi Mi Fan Sale मध्ये Mi फ्लॅगशिप मोबाईलमधील Mi 10 हा मोबाईल फोन 44999, Mi 10T हा 35999 रुपये आणि Mi 10T Pro 39999 मध्ये खरेदी करता येईल.

दहा हजारांच्या आताच मिळतील ‘हे’ फोन – Redmi ब्रँडचा लोकप्रिय फोन Redmi 9i हा केवळ 8299 रुपये आणि Redmi 9A हा 8999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल.

नोटबूक आणि टीव्ही स्टिकवर ही सूट – 22 डिसेंबर पर्यंत सुरु असणाऱ्या Xiaomi Mi Fan Sale मध्ये Mi Notebook 14 वर तब्बल 8 हजारांचा डिस्काउंट देण्यात आला असून तो आपल्याला 41999 रुपयात मिळू शकेल.

तर Mi Notebook 14 Horizon 50999 रुपयात खरेदी करता येईल. तसेच या Mi Fan Sale मध्ये आपण 3299 रुपयांत Mi TV Stick आणि 4999 रुपयात Mi Box 4K विकत घेऊ शकता.

यावरही मिळेल खूप डिस्काउंट – या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टबँड आणि इअरबँड्स वरही डिस्काउंट मिळणार आहे. Mi Smart Band 4 फक्त 1999 रुपयांमध्ये तर Redmi Smart Band 1399 रुपयात खरेदी करू शकता.

तसेच याच सेलमध्ये आपल्याला ऑडिओ सिस्टमवर सूट देखील मिळू शकते. यामध्ये, Redmi Earbuds 2C केवळ 1299 आणि Mi True Wireless 2C 2299 रुपयांत तुम्ही खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment