अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी येथील शेतकरी सौ भारती सुनील बोठे यांना डाळिंब पिक विमा नुकसान भरपाई रक्कम रुपये ७५०००/-व तक्रारीचा खर्च रुपये दहा हजार अशी एकंदरीत रुपये ८५०००/-सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांनी द्यावी असा महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा देवेंद्र हेंद्रे, सदस्य श्रीमती चारू विनोद डोंगरे व दुसऱ्या सदस्या श्रीमती संध्या श्रीपती कसबे यांनी नुकताच दिला आहे या प्रकरणात तक्रारदारा तर्फे ज्येष्ठविधीज्ञ ॲड.सुरेश लगड यांनी काम पाहिले
याबाबतची थोडक्यात हकीगत अशी की वाळकी येथील प्रगतशील शेतकरी सौ भारती सुनील बोठे यांनी त्यांचे मालकीचे गट नंबर ६२३मध्ये १ हेक्टर ५० आर क्षेत्रांमध्ये भगवा डाळिंब पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2016 च्या सालासाठी सामनेवाले नंबर १ रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे विमा उतरवलेला होता व सामनेवाले नंबर २ सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकीचे तक्रारदार भारती बोठे या खातेदार आहेत तक्रारदार भारती बोठे यांनी रक्कम रुपये ८२५० चा विमा दिनांक२/०८/२०१६ रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी मधून सामनेवाले नंबर १ रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीस आदा केला.

तक्रारदारांच्या लगतच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झाली परंतु तक्रारदार यांना ती मिळाली नाही म्हणून तक्रारदार सो भारती बोठे यांनी पिक विमा रक्कम मिळावी म्हणून सामनेवाले सेंट्रल बँकेस मागणी केली परंतु बँकेने उत्तर दिले नाही शेवटी तक्रारदार यांनी दिनांक १५/०९/१७ रोजी वकिलांमार्फत सामनेवाले रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळकी यांना नोटीस देऊन पिक विमा नुकसान भरपाईची मागणी केली
तरीदेखील पिक विमा नुकसान भरपाई तक्रारदार यांना अदा केली नाही म्हणून सौ भारती बोठे यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे दाद मागितली असता या आयोगाने संपूर्ण कागदपत्र शपथ पत्र व लेखी म्हणणे ऐकून घेऊन सामनेवाले नंबर २ सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांना केवळ दोषी धरून वर नमूद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई मंजूर केली
विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराने उतरलेला पिक विमा हप्ता रक्कम रुपये ८२५०हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया वाळकी शाखेने विहित मुदतीत म्हणजे दिनांक १४/०७/२०१६ पर्यंत न पाठवता विलंबाने म्हणजे दिनांक २/०८/२०१६ रोजी सामनेवाले रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठवला पिक विमा हप्ता विहित मुदतीत न पाठवल्याने विमा कंपनीने विमा हप्ता स्वीकारला नाही त्यामुळे पिक विमा उतरवला गेला नाही व तक्रारदार या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने यामध्ये सामनेवाले नंबर २ या सेंट्रल बँकेने कर्तव्यात कसूर केला. सामनेवाले नंबर २ सेंट्रल बँकेने पिक विमा हप्त्याची रक्कम विहित मुदतीत भरलेली नसल्याने तक्रारदारास विम्याचा लाभ मिळालेला नाही यात सामनेवाली नंबर २ सेंट्रल बँक यांचेच हलगर्जीपणामुळे तक्रारदारांना शारीरिक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला व तक्रारीचा खर्च करावा लागला
माननीय आयोगाने तक्रारदारास डाळिंबी पिक विमा नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये ८० हजार व त्यावर दिनांक९/०१/२०१८पासून संपूर्ण रक्कम मिळे पावेतो दरसाल दर सेकडा नऊ टक्के दराने व्याज द्यावे तसेच सामनेवाली नंबर दोन सेंट्रल बँक ऑफ इंडिया वाळकी शाखेने तक्रार बोठे यांना तक्रार अर्जाचा खर्च रुपये दहा हजार द्यावा अशी एकंदरीत रक्कम रुपये १ लाख ३२ हजार २५० व्याजासह तीस दिवसात द्यावी असा महत्वपूर्ण आदेश केला मात्र सामनेवाले नंबर १ रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध तक्रारदार भारती बोठे यांची तक्रार खारीज करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे एका राष्ट्रीयकृत बँकेला ग्राहक आयोगाने दोशी धरण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी त्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे या महत्वपूर्ण प्रकरणात तक्रारदारांच्या वतीने ज्येष्ठविधीज्ञ एडवोकेट सुरेश लगड एडवोकेट शारदा लगड यांनी काम पाहिले त्यांना एडवोकेट सुजाता बोडके एडवोकेट विराज लगड व एडवोकेट प्रतीक्षा मंगलाराम यांनी सहाय्य केले