सावधान! महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोना पुन्हा होतोय सक्रिय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. दरम्यान यातच महसूल मंत्र्यांच्या तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार अद्यापही कायम आहे. सुरुवातीच्या काळात सुसाट असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूवी कमी झाला होता. यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र सावधान तालुक्यात कोरोना पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये होणार्‍या गर्दीचा परिणाम कोविडचा प्रदुर्भाव वाढण्यात होण्याचा अंदाज खरा ठरतो की काय अशी अवस्था मंगळवारच्या अहवालातून समोर आली आहे. मंगळवारी (ता.10) खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून मोठ्या कालावधीनंतर ग्रामीणभागापेक्षा शहरी रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे

समोर आल्याने संगमनेरकरांच्या चिंता वाढल्या आहेत. या अहवालातून तालुक्यातील एकूण 27 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले असून त्यातील तब्बल 16 रुग्ण संगमनेर शहरातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णगतीतही काहीशी भर पडली असून बाधितांची एकूण संख्या आता 4 हजार 541 वर पोहोचली आहे.

देशातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी दिवाळीनंतर देशात कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली असून अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनीही त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकार्‍यांना व तहसीलदारांना आवश्यक ती तयारी सज्ज ठेवण्यास सांगीतले आहे.

आपल्याकडे असा प्रकार होणार नाही यासाठी नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असून शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. नागरिकांनी कोविडचे गांभिर्य लक्षात घेवून खरेदीसाठी बाहेर पडताना सर्व निकषांचे पालन करण्याची गरज आहे.

अन्यथा आपली दिवाळी कोविड हेल्थ सेंटर अथवा रुग्णालयात जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मंगळवारी वाढलेली शहरी रुग्णगती पाहता ‘संगमनेरकरांनो सावधान! रुग्णसंख्या वाढत आहे..’ असे सांगण्याची वेळ आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe