सावधान ! यापुढे रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणे महागात पडणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- आतापर्यंत आपण शहरातील अंतर्गत रस्त्यासह थेट महामार्गवर देखील मोठ्या संख्येने मोकाट जनावरांचे कळप बसल्याचे पाहतो आहोत.

या मोकाट जनावरांमुळे अपघात ही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता रस्त्यावर अशी मोकाट जनावरे सोडणे त्या जनावरांच्या मालकांना चांगलेच महागात पडू शकते.

कारण मनपा प्रशासनाकडून यापुढे आता मोठ्या प्रमाणात दंड कसूल करणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळवले आहे. याबाबत सविस्तर असे की,

शहरातील अंतर्गत रस्त्यावर व शहरातून जाणाऱ्या सर्वच महार्मावर मोकाट जनावरांचे कळप फिरत असतात. अनेकवेळा या जनावरांची आपसात झुंज लागून या जनावरांच्या घोळक्यात वाहनचालक जखमी झाले आहे.

मागील वर्षी बोल्हेगाव भागात मोकाट गायीने केलेल्या हल्ल्यात एक चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या सर्व पार्श्वभुमीवर मनपाने आता जर रस्त्यावर मोकाट जनावरे आढळून आली तर ती उचलून नेली जाणार आहते.

तसेच त्यांच्या मालकांना याबाबत आर्थिक दंड केला जाणार आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागाच्या या विभागाने जर रस्त्यावर मोकाट जनावर पकडले व त्यानंतर जर संबंधित मालकाने जागेवरच जनावर सोडवले तर संबंधितास त्या जनावरास केल्या जाणाऱ्या दंडाच्या पाचपट दंड वसूल करण्यात येणार आहे.

या पथकाने पकडून आलेले जनावरे जर सात दिवसांच्या आत त्या मालकांनी सोडवून नेले नाही तर या जनावरांचा लिलाव केला जाणार आहे. तरीपण यापुढे कोणीही रस्त्यावर मोकाट जनावरे सोडू नयेत असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment