अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्याकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. राहुल जगन्नाथ देसले असे मारहाण झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांचा कार्यभार काढून घेतल्याच्या वादातून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलिसात शेटे यांच्यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. राहुल जगन्नाथ देसले यांना रविवारी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान तीन व्यक्तींनी मारहाण केली.
डॉ. देसले यांनी याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. सहयोगी प्राध्यापक असून विद्यार्थी वसतिगृहाचा रेक्टर आहे. माझ्यावर चौघांनी एका मोटारीतून येऊन हल्ला केला.
मोटारीत सुरक्षा अधिकारी शेटे हे होते. कुलसचिव मोहन वाघ हे माझे मित्र असून गावचे आहेत. त्यांच्याकडे मी शेटे यांची तक्रार केली असावी या संशयातून माझ्यावर हल्ला करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा