केळं दिली नाही म्हणून चोपले ! ‘त्या’तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- वाटपासाठी केळी न दिल्याच्या रागातून तिघांनी एकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. जुने मुकूंदनगर येथे ही घटना घडली.

याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात अर्शद आयुब शेख, आरिफ सय्यद उस्मान, तौसिफ अन्सार शेख (तिघे रा. मुकूंदनगर, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीत फैजाउद्दीन अजीजउद्दीन शेख (रा. कादरीमशिदीजवळ मुकुंदनगर) हे केबल ऑपरेटर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केबल ऑपरेटर शेख यांच्याकडे हर्षद शेख व इतर लोकांनी केळी वाटप करण्यासाठी मागितली मात्र त्यांनी देण्यास विरोध केला

त्यामुळे रागवलेल्या तिघांनी केबल ऑपरेटर शेख यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फैजाऊद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment