अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील मढी शिवारात राहणारे शेतकरी शिवाजी हरिभाऊ बोरुडे, वय ६० रा. बोरुडेवस्ती, मढी यांना शेतीच्या वादाच्या कारणातून कुऱ्हाड व दगडाने मारहाण करुन त्यांचा भाऊ व पत्नी यांना शिवीगाळ करत धमकी दिली.
तसेच मारहाण करणाऱ्यांनी मुलाच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. याप्रकरणी जखमी शेतकरी शिवाजी हरिभाऊ बोरुडे यांच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे गणेश गोपीनाथ मरकड,
मंदा गोपोनाथ मरकड, राणी गोपीनाथ मरकड, शिवाजी चंद्रभान मरकड, सर्व रा. मढी, ता. पाथर्डी यांच्याविरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोना नवगिरे हे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved