कोरोनाप्रश्नावर आमदार झाले आक्रमक म्हणाले अन्यथा माणसं किड्यामुंग्यांसारखे मरतील…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- कोरोना नियंत्रणासाठी व मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाने सुरू केलेले ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान लोकप्रतिनिधींसह आरोग्य यंत्रणेने प्रभावीपणे राबवाबे; अन्यथा माणसं किड्यामुंग्यांसारखे मरतील, अशी भीती आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केली.

अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत कानडे बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे,

तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे, सभापती संगीता शिंदे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर,

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, इंद्रनाथ थोरात, जि. प. सदस्य शरद नवले, ज्ञानेश्वर मुरकुटे, नगरसेवक प्रकाश ढोकणे, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, मुख्तार शाह, बाबासाहेब दिघे, बाबासाहेब कोळसे,

सरपंच भारत तुपे आदी उपस्थित होते. कानडे म्हणाले, हे अभियान लोकचळवळ व्हावी. तालुक्यात सर्वत्र ते एकाच वेळी सुरू व्हावे.

शासनाने परिपत्रक काढले. मात्र, पैसे दिलेले नाहीत. सर्वेक्षणासाठी थर्मल गन, ऑक्सिमीटर, हँडग्लोव्हज, सॅनिटायझर लागतील. नगरपालिका व ग्रामपंचायतींनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून त्या घ्याव्यात.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe