Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या परिसरातील जंगलाला अज्ञात व्यक्तीने लाग लावल्याने मोठ्या प्रमाणात झाडे- झुडपे जळाली असून आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी भंडारदरा धरण शाखेचे कर्मचारी उशिरापर्यंत प्रयत्न करत होते.
अकोले तालुक्यातील महत्वाचे धरण समजल्या जाणार्या भंडारदरा धरणाच्या परिसरात असणाऱ्या जंगलाला अज्ञात व्यक्तीने रविवारी दुपारी आग लावली. या आगीमुळे भंडारदरा धरणाच्या बगिच्यापासुन ते धरणावरील काच बंगल्यापर्यंत संपुर्ण जंगल जळुन खाक झाले.

लागलेल्या आगीमुळे सर्वत्र जाळ आणि धुरांचे लोट दिसत होते. आगीमध्ये जंगल संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन परिसरातील लहान मोठी झुडपे जळुन खाक झाली आहेत.
रखरखते ऊन व वार्यामुळे आग ‘पसरतच गेली. ही आग भंडारदरा धरणाच्या भिंतीवर असणाऱ्या विश्रामगृहापर्यंत पोहचली. वेळीच भंडारदरा धरणाच्या कर्मचार्यांच्या आग लागलेली लक्षात आल्याने तात्काळ आग विझविण्यासाठी कर्मचार्यांनी प्रयत्न केले.
रात्री उशिरापर्यंत आगीवर नियत्रंण मिळविण्याचे प्रयत सुरुच होते. आगीमुळे भिंतीवर रस्त्याच्या दोन्ही बाजुने लावलेल्या शोभेच्या झाडांना फटका बसला. भंडारदरा धरणाच्या भिंतीलाही मोठ्या प्रमाणात गवत व झाडा झुडपांचा वेढा पडलेला आहे.
उन्हामुळे हे गवत व झुडपे वाळलेली आहेत. ज्या पद्धतीने भंडारदरा धरणाच्या परिसरात अज्ञात व्यक््तीकडुन आग लावली गेली, तसा प्रयत्न पुन्हा होऊ नये यासाठी भंडारदरा धरण शाखेकडुन खबरदारी घेणे गरजेचे आहे, मागील वर्षी या भिंतीवरील गवत व झुडपे काढली गेली होती. यावर्षी मात्र अद्यापही धरणशाखेने कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही.