भंडारदरा धरण ‘इतके’ भरले

Published on -

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत.

पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे भंडारदरा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे.

असे असले तरी यावर्षी धरणात पाणीसाठा शिल्लक होता. दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणात आलेल्या नवीन पाण्यामुळे भंडारदरा धरण १ आॅगस्ट रोजी ५० टक्के भरले.

शुक्रवारी दिवसभर पावसाने या परिसरात जवळपास विश्रांती घेतली असली तरी नंतर रात्रभर रतनवाडी, भंडारदरा, पांजरे परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे शनिवारी सकाळी धरणात ७८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली.

त्यामुळे धरणातील पाणी साठा शनिवारी सकाळी ५ हजार ५०८ दशलक्ष घनफूट झाला होता. १५ ऑगस्टला या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी होत असते.

निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची आणि आनंद लुटण्याची संधी आणि आनंद पर्यटक घेत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News