Parner News : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमधील फ्युचर मिनींग टूल्स प्रा. लि. या कंपनीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यासामुळे हंगा येथील दळवी वस्तीवरील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. येत्या आठ दिवसांत यावर उपाययोजना न केल्यास टाळेबंद आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
कंपनीचे सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा गेल्या १० वर्षांपासून बाधित शेतकरी त्रास सहन करत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार कंपनी प्रशासनाकडे विनंती केली, अनेकवेळा तक्रार करूनही कंपनी या प्रश्नाची दखल न घेता कंपनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने कायम होत असलेल्या त्रासामुळे हे शेतकरी संतप्त झाले असून,
आजपावेतो आमच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई कंपनीने द्यावी व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून शेतात सोडण्यात येणारे पाणी कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली असून,
येत्या आठ दिवसांत दखल न घेतल्यास दळवी वस्तीवरील शेतकरी टाळेबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्रस्त शेतकरी सुधाकर दळवी, जगन्नाथ दळवी, मिठ् दळवी, नानाभाऊ दळवी, बाबु दळवी, सुभाष दळवी, प्रमोद दळवी, अक्षय दळवी, सागर दळवी, मधुकर दळवी यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे.