मोठी बातमी : अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग २० आॅगस्टपर्यंत सील

Published on -

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार गेला आहे. 

परंतु यात अहमदनगर शहर कोरोनाचे  हॉटस्पॉट बनू पाहत आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. आता अहमदनगरमधील सावेडीतील वैदुवाडी येथे कोरोनाचे जास्त रुग्ण  सापडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर २० आॅगस्टपर्यंत सील केला आहे.

महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शनिवारी (८आॅगस्ट) आदेश काढून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.वैदुवाडी रोड, शुभंकरोती बंगला, प्रियदर्शनी कॉलनी, विजय आर्ट, धनंजय कार केअर, लगड यांचे घर, अंबिका स्टील, गुरूकृपाधाम कमान,

रेवती नर्सिंग होम, हॉटेल रामा कॉर्नर ते शुभंकरोती बंगला हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सिद्धीविनायक कॉलनी, गणेश कॉलनी, तुळजा भवानी मंदिर, पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक, लोकमान्यनगर, बालाजी कमान परिसरस, श्रेयस कॉलनी, कुष्ठधाम रोड,

गुरूकृपा कॉलनी, वैभव कॉलनी व रेणावीकर शाळा परिसर  बफर क्षेत्र म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे. वैदुवाडी परिसरात अत्यावश्यक सेवा महापालिका प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहे. परिसरात रहदारीसाठी आणि जीवनाश्यवक सेवा पुरविण्यासाठी शुभंकरोती बंगला समोरील वैदुवाडी रोड खुला राहिल.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. एकट्या अहमदनगर शहरात 2 हजार 329 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील तब्बल 3 हजार 210 नगरकरांना प्रशासनाने होम क्वारंटाईन करून ठेवले आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात  येत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!