अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- कोल्हार बुद्रुक येथे तिरट नावाच्या झुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 41 जणांना पोलिसांनी ताब्यात आहेत. त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये 8 लाख 19 हजार 140 रुपये रोख 2 लाख 66 हजार 650 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 32 मोबाईल, सात चारचाकी वाहणे,
मोटार सायकल व जुगाराचे साहित्य असे मिळून 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सविस्तर असे की, एसपी अखिलेश कुमार सिंह यांना मिळालेल्या माहितीनुसार कोल्हार बुद्रूक, ता- राहाता येथे कोल्हार ते लोणी जाणारे रोडचे कडेला मुदस्सर शकील शेख,
रा. कोल्हार बुद्रूक हा कय्युम करीम शेख याचे इमारतीचे टेरेसवर 25 ते 30 लोकांना एकत्र जमवून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवीत आहे. सदरची माहीती परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,
पोनि दिलीप पवार यांनी व त्यांच्या पथकाने कय्यूम करीम शेख याचे इमारतीचे टेरेसवर 35 ते 40 इसम पाच वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार बसून पत्ते घेवून तिरट जुगार खेळत असताना दिसले. त्यांना पोलिसांनी नावे विचारले असता चेतन विजय वाघमारे, मुदस्सर शकील शेख, अश्पाक जमील शेख, सागर वसंत बेदाडे,
दिलावर मन्सूर शेख, अरबाज राजू पठाण, माहीद कय्यूम शेख, जुबेरखान निसारखान पठाण, असीम तसलिम शेख, अर्शद रशिद मोमीन, वंसत लक्ष्मण वडे, अमित हरिभाऊ गाडेकर, लालू मारुती चौधरी, कय्युम गुलाब पठाण, नवाब हुसेन शेख, जाहीद दिलावर सय्यद, सय्यद अली मोहमंद, सतिष हणूमंत वैष्णव, रविंद्र सुभाष चकोर,
मुनावर सलीम शेख, दिपक रामदास उंबरे, परवेज शेख अब्दुल रेहमान, अब्बास राजू शेख, चाँद इब्राहीम शेख, जयहींद गोविंद माळी, विलास दत्तात्रय चोथे, सागर मदनलाल वर्मा, गणेश विठ्ठल जेजूरकर, इम्रान याकूब मोमीन, शकील सलीम शेख, नजीर अजीज शेख, संतोष बाबूराव चौधरी, शकील जब्बार शेख,
संजय कांतीलाल पटेल, नुमान सत्तार शेख, संकलेन कय्यूम शेख, भाऊसाहेब रामराव चौधरी, सचिन बाळाराम पवार, अमोल भास्करराव वाघमारे, गणेश रंगनाथ सोमासे, महेश आण्णा बुरकूल असे सांगितले. त्यांच्या अंगझडतीमध्ये 8 लाख 19 हजार 140 रुपये,
2 लाख 66 हजार 650 रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे 32 मोबाईल, 33,00,000 रुपये किमतीची एकूण 7 चारचाकी वाहने व 32 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकली व तिरट जुगाराची साधने असा एकूण 44 लाख 17 हजार 790 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved