खरीप पीक कर्जासंदर्भात मोठी बातमी; वाचा..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- 2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटपाची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची

माहिती बँकचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, व्हा.चेअरमन रामदास वाघ व ज्येष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून कर्ज मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

तसेच सध्याची परिस्थिती पाहता कर्ज प्रकरण करताना अनेक समस्यांचा सामनाही शेतकऱ्यांना करावं लागत आहे. या अनुषंगानेच 2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत ऑगस्ट

महिनाअखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय याआधी घेतला होता. याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. मात्र, शेतकर्‍यांच्या मागणी व अडचणीचा विचार करून बँकेने आता ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने बँकेला खरीप हंगामासाठी 1 हजार 498 कोटींचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण करून बँकेने उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्जवाटप केलेले असून आतापर्यंत 1 हजार 635 कोटीचे वाटप केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन गायकर,

व्हा.चेअरमन वाघ व ज्येष्ठ संचालक कर्डिले यांनी दिली. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आलेल्या समस्यांचे निराकरण करून शेतकऱ्यांना आता कर्ज मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment