Ahmednagar News : गौतम अदानी हे नाव कोणी ओळखत नाही असे शोधून सापडणार नाही. देशभरातील अव्वल उद्योगपतींपैकी एक म्हणजे गौतम अदानी. गौतम अदानी हे अहमदनगर जिल्ह्यात आले होते.
ते शिर्डीत साईबाबांचे दर्शन घ्यायला आले होते. सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेत ते साईचरणी लीन झाले. दरम्यान त्यानंतर एका दृश्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
ते म्हणजे गौतम अदानी यांच्या वाहनाचे खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र अर्थात माजी खा. सुजय विखे पाटील हे सारथ्य करत होते. सुजय विखे पाटील हे गौतम अदानींचे वाहन चालवत होते.
देशातील उद्योगपती गौतम अदानी हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यांनी सपत्नीक दर्शन घेत साईबाबांच्या समाधीवर फुले वाहिली. तसेच पांढरी शाल देखील अर्पण केली.
त्यानंतर ते सपत्नीक द्वारकामाई तसेच गुरुस्थानला भेट दिली. तेथे जात त्यांनी देत दर्शन घेतले. दरम्यान यावेळी अदानी यांना साईबाबांची पिवळ्या रंगाची शाल, पांढऱ्या रंगाची साईमूर्ती माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते त्यांना देऊन सत्कार करण्यात आला.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे यावेळी उपस्थित होते. साईबाबांच्या पाया पडल्यानंतर गौतम अदानी हे सपत्नीक मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वार क्रमांक दोनमधून बाहेर आले.
त्यानंतर लगेचच माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या गाडीचा ताबा घेतला. त्यांनी स्वतः त्यांच्या गाडीचे सारथ्य केले. या दृश्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर हा सगळा ताफा विखे कुटुंबियांच्या निवासस्थानी रवाना झाला.