अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-राज्यासह मुंबईत कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
राज्य सरकारने लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. परंतु रेल्वे प्रशासन लोकल सुरू करण्याला जाणीवपूर्वक वेळकाढू पणा करीत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे.
कोरोना काळातही श्रमिक ट्रेन, कोकण स्पेशल आदी ट्रेन चालवण्याबाबत राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात खटके उडत होते. आता सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकार आग्रही असले तरी, रेल्वे प्रशासन त्याला जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे.
त्यात आता राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी थेट पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे. ‘अनलॉक’चा पाचवा टप्पा सुरू झाल्यानंतरही मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा अद्याप बंदच आहे.
राज्य सरकारनं सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतरही केंद्रानं त्यावर निर्णय घेतलेला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल व राज्यातील भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
विविध नियम व अटींच्या अधीन राहून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं २८ ऑक्टोबर रोजी रेल्वेला दिला आहे. मात्र, रेल्वेनं अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. आता यावरून राजकारण सुरू झालं आहे. रेल्वे विभाग मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यात खोडा घालत आहे,
असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. रोहित पवारांनीही देशमुख यांच्या सुरात सूर मिसळत रेल्वेमंत्री व भाजपवर टीका केली आहे. ‘श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्वीट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरू करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत,
याचं आश्चर्य वाटतं. स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात,’ असा बोचरा टोला त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना हाणला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved