आत्मदहनासाठी पेट्रोलच्या बाटल्या घेऊन काळे कुटुंबीयांचे उपोषण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-जमीन खरेदीसाठी दिलेली नजराणा रक्कम परत मिळण्याच्या मागणीसाठी मौजे कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील काळे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजलसर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात आत्मदहनासाठी पेट्रोलच्या बाटल्या घेऊन उपोषण केले.

या उपोषणात विशाल काळे, उप्परलाल काळे, हुसनी काळे आदी सहभागी झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोळगाव, वाघदरा शिवार (ता. श्रीगोंदा) येथे दशरथ लगड,

अशोक लगड, अरुण लगड, रमेश लगड यांना गट नंबर 350 मधील क्षेत्र 3.5 एकर जमीनीच्या खरेदीसाठी नजराणा रक्कम 10 लाख रुपये काळे कुटुंबीयांनी दिली होती.

मात्र लगड यांनी नजराणा रकमेची पावती असतानासुद्धा जमीनीचा व्यवहार न करता काळे यांचे चुलते मिणास काळे, परेश काळे, तेजस काळे, निलेश चव्हाण,

रेश्मा चव्हाण व मंदा काळे (सर्व रा. कोळगाव) यांच्याशी व्यवहार केला. आंम्ही व्यवहार करण्याच्या तयारीत असून देखील सदर जागेची परस्पर विक्री करण्यात येत आहे.

या कारणावरुन चुलते यांनी घरी येऊन मारहाण केली असून, संबंधीतांवर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मारहाण करणारे व नजराणा रक्कम घेऊन जागेची विक्री न करणार्‍यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

पोलीसांकडे दाद मागितली असता पोलीस स्टेशन मधून हाकलून दिले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. लगड जमीनीचा व्यवहार करीत नसून, दिलेली 10 लाखाची नजराणा रक्कम देखील परत देण्यास तयार नसल्याने

काळे कुटुंबीयांनी आत्मदहनासाठी पेट्रोलच्या बाटल्या घेऊन उपोषण केले. तर सदर व्यक्तींकडून कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News