अतिक्रमण धारकांवर महसूल विभागाचा आशीर्वाद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव हद्दीत असणार्‍या महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर काही इसमानी अवैधपणे अतिक्रमणं केले आहे.

हि बाब महसूल विभागाच्या लक्ष्यात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधीत व्यक्तींच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकार्‍यांनी केली नसल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव हद्दीत वनविभागाचे गट क्रमांक 8 मध्ये महसूल विभागाची गायरण जमीन असुन या जमिनीलगत असलेल्या म्हातारपिंप्री या गावच्या हद्दीतील काही इसमांनी अवैधपणे महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर अवैधपणे अतिक्रमणं केले आहे.

या क्षेत्रात त्या इसमांनी विनापरवाना पाईपलाइन करून, अनधिकृतपणे शेततळे बांधून अतिक्रमण केले आहे. तसेच वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता अनेक झाडांची कत्तल केली असून या कडे महसुलच्या अधिकार्‍यानी दुर्लक्ष केल्याचे महसूल विभागाच्या अधिकार्‍याचा आशीर्वाद तर नाही ना? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहे.

दरम्यान हि बाब महसूल विभागाच्या लक्ष्यात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधीत व्यक्तींच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकार्‍यांनी केली नसल्याने परिसरात चर्चा रंगल्या आहेत. या अतिक्रमण धारक इसमाला कोणत्या अधिकार्‍याचा आशिर्वाद आहे ? असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe