३५ वर्षांच्या युवकाचा मृतदेह रूळावर सापडला !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील रेल्वेलाइनवर ३५ वर्षांच्या पुरुषाचा मृतदेह शुक्रवारी आढळला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेन करुन ओळख पटवण्यासाठी मृतदेह शवागरात ठेवण्यात आला आहे.

कोणाला माहिती मिळाली, तर संपर्क करण्याचे आवाहन पोलिस नाईक आर. जी. साळुंखे यांनी केले आहे. मृताच्या अंगात निळ्या रंगाचा फूल टी शर्ट,

पांढरी काळ्या पट्ट्याची डिझाईन असलेली पँट, अंगाने सडपातळ, उंची पाच फूट, चार इंच, रंग सावळा, नाक सरळ, केस लहान, दाढी केलेली असून डोक्याला मागे जुनी जखमेची खूण आहे, असे पोलिस म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe