अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ या देशव्यापी संघटनेच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात आरोग्यसेवेत उत्कृष्ट काम करणार्या शहरातील सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला भारतरत्न मदर टेरेसा सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी अमोल शिंदे, विल्यम चंदनशिव, दिनेश गोर्डे, नितीन गोर्डे, पास्टर सुधीर पाडळे, राजेश थोरात, किरण पवार, सतीश मिसाळ, प्रिया ढगे, प्रा.प्रफुल कसोटे आदि उपस्थित होते.
दरवर्षी आरोग्य सेवेत उत्तम उल्लेखनीय कार्य करणार्या रुग्णालयाला अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने भारतरत्न मदर टेरेसा सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी बुथ हॉस्पिटलने कोरोना महामारीच्या संकटकाळात योगदान देऊन अनेकांचे जीव वाचविले आहे.
1902 पासून सॅलवेशन आर्मीच्या माध्यमातून सुरु झालेले बुथ हॉस्पिटल गोर-गरीब रुग्णांसाठी मोठा आधार ठरला आहे. कोरोनासह इतर आजार असलेल्या रुग्णांवर देखील मोफत उपचार केले जातात.
हॉस्पिटलच्या या सामाजिक कार्यास अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ नेहमीच पाठीशी उभा राहणार असल्याची भावना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना मेजर देवदान कळकुंबे यांनी बुथ हॉस्पिटलच्या माध्यमातून गोर-गरीब रुग्णांची सेवा अविरत सुरु आहे.
मात्र कोरोना सारख्या महामारीत सर्व प्रथम बुथ हॉस्पिटलने पुढाकार घेऊन अनेकांना जीवदान दिले. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची ईश्वररुपी मनुष्यसेवा करण्यात आली. साडेतीन हजार पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्णांना मायेचा आधार व मानसिक बळ देण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सावन वाघमारे, उपाध्यक्ष सुमित ढगे, रेव्ह.दीपक अल्हाट, मॉर्टिन पारधे, हर्षल जाधव, सुरज घाटविसावे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन जिल्हा सचिव रवी चांदेकर यांनी केले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved